उजनी धरणात अनोळखी मृतदेह सापडला

सोलापूर: करमाळा तालुक्यातील केतूर येथील उजनी जलाशय पात्रात अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे मच्छिमारांना सकाळी दिसला. त्यानंतर मच्छिमारांनी सदरची माहिती केतूरचे पोलीस पाटील गणपत पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी तातडीनं करमाळा पोलीस स्टेशनला याबाबत कळविले.केतूर येथील उदयसिंह मोरे पाटील यांच्या शेताजवळील पाण्यात मृतदेह तरंगत असल्याचे करमाळा पोलीस ठाण्याला कळविले असून त्यानुसार करमाळा येथून आलेल्या पोलिसांनी सदर मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचा पंचनामा केला आहे. दरम्यान हा मृतदेह कुणाचा आहे याची माहिती अद्यापही मिळाली नसून सदरील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे करत आहेत.

Latest News