रायकर यांचा मृत्यू या प्रकरणाची चौकशी करणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई | टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. दुर्दैव म्हणजे वेळेत अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने रायकर यांचा मृत्यू झाला. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं आश्वासनंही त्यांनी दिलं आहे. राजेश टोपे यावेळी म्हणाले, पांडुरंग रायकर यांच्या प्रकरणात रूग्णवाहिका न मिळणं हे फार दुर्देवी आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी नियम घालून देण्यात आले आहेत. याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी याचे प्रयत्नही सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचे कठोर आदेश देण्यात आले आहेत. तरीही अशा घटना घडणं निषेधार्ह आहे.”

कोरोनाच्या काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियाना मदत केली जातेय. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना विम्याची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पांडुरंग रायकर यांच्या प्रकरणावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली. पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो, असं मोहोळ यांनी म्हटलंय.

Latest News