आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही – निलेश राणे

nilesh-kangana

मुंबई : मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रनौतला माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी धारेवर धरले आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असे निलेश राणे यांनी कंगनाला बजावले.

रणवीर सिंह, रणबीर कपूर, विकी कौशल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना ड्रग्ज टेस्ट देऊन निर्दोषत्व सिद्ध करण्याचे चॅलेंज कंगनाने कालच दिले होते. त्यानंतर निलेश यांनी “फक्त रणवीर-रणबीरच का? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ड्रग्ज टेस्ट करावी. कारण तेही बॉलिवूडच्या आतल्या गोटातील कलाकारांच्या जवळचे आहेत” अशी मागणी केली होती ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.

Latest News