गडचिरोली बदली झाली नसून आपण हे ठिकाण मागून घेतलं असल्याचं – IPS संदीप पाटील


पुणे | IPS अधिकारी संदिप पाटील यांची उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्रपदी बदली झाली आहे. ही बदली झाली नसून आपण हे ठिकाण मागून घेतलं असल्याचं संदीप पाटील यांनी सांगितलं आहे. ५ वर्षापूर्वी गडचिरोलीत असताना छोट्या प्रमाणावर काम करायला सुरुवात केली होती. तिथं काम करण्यास अधिक वाव असल्याने बदली मागून घेतली असल्याचं, संदिप पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच मला पुणेकरांनीही चांगली साथ दिली असल्याचही त्यांनी सांगितलं आहे. दोन वर्षापूर्वी भिमा कोरेगाव येथे दंगल झाली होती, तेव्हा पुणे ग्रामीण भागात आलो होतो. त्यावेळी देशभरातून अनेक लोक इथं येणार होते, त्यातून काही अघटीत घडणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. सर्व मीडियाचं त्याकडे लक्ष होतं. त्यावेळी पारर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. 1 जानेवारीचा कार्यक्रम शांततेत पार पडल्याने देशभरात चांगला संदेश पोहोचला, असं संदिप पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, संदीप पाटील हे पुण्यात येण्याआधी त्यांनी सातारा आणि गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक म्हणूनही ठसा उमटवला आहे. तसेच त्यांनी पोलिसांच्या कल्याणासाठी विविध योजनाही राबवल्या आहेत.