खेळामुळे मिळते मानसिक कणखरता … लक्ष्मण जगताप

खेळामुळे मिळते मानसिक कणखरता … लक्ष्मण जगताप
डीवायची पोर हुश्शार… पहिल्या ‘मोरया चॅम्पियन्स चषका’चे मानकरी
मोरया युथ फेस्टिव्हलची उत्‍साहात सांगता
पिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2019) – खेळामुळे मुलांना मानसिक कणखरता मिळते. पालकांनी मुलांना विविध क्रीडाप्रकार शिकण्यासाठी प्रेरणा द्यावी. यामुळे देशाला चांगले, नैपुण्यवान खेळाडू मिळतील. कर्तव्य फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘मोरया युथ फेस्टिव्हल’ मधील विविध क्रीडा स्पर्धांना पहिल्याच वर्षी 4 हजार खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला. ही बाब नोंद घेण्यासारखी आहे, असे मत पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्‍त केले. यावेळी पहिला ‘मोरया चॅम्पियन्स’ चषक उत्कृष्ट सांघिक कामगिरी करणा-या पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाने पटकावला.
पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविणारी कर्तव्य फाऊंडेशन ही अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’चे आयोजन राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी केले. या फेस्टिव्हल मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेते स्पर्धक, संघांना आमदार जगताप यांच्या हस्ते गौरवण्यात आले. हा कार्यक्रम चिंचवड येथील गंधर्व हॉल येथे मंगळवार (दि. 12) घेण्यात आला. यावेळी ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक बाबू नायर, भाजपा महिला शहराध्यक्षा शैलजा मोळक, इरफान सय्यद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माधव देशपांडे, किरण येवलेकर, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. माधव भट, डॉ. अमोल साने, जयहिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योतिका मलकानी, प्रा. शिल्पागौरी गणपुले, राजेश पाटील, किरण फेंगसे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात ॲड. सचिन पटवर्धन म्‍हणाले की, तरुण पिढीमध्ये भरपुर कलागुण आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतुने कर्तव्य फाऊंडेशनने प्रथमच मोरया युथ फेस्टिव्हलचे आयोजन केले आणि त्‍याला युवकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 57 महाविद्यालयांमधील 4 हजार विद्यार्थ्यांनी विविध 26 प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. युवकांचा हा उत्साह पाहून खूप आनंद झाला. यापुढील काळात राष्ट्रीय पातळीवर महोत्सव आयोजनाचा प्रयत्न राहिल, असे पटवर्धन यांनी सांगितले.
यावेळी माधव देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्‍त केले. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – कॅरम – ऋषिकेश सुर्यवंशी (प्रथम), श्रेयस ओसवाल (व्दितीय), इश्वरसिंग चिटोडीया (तृतीय), बुध्दीबळ – सागर सुरवडे (प्रथम), सिध्दार्थ गौर (व्दितीय), प्रतिक मेहता (तृतीय), रायफल शुटींग – प्रशांत क्षीरसागर (प्रथम), आशिष सांगोलकर (व्दितीय), यशवंत बोंडे (तृतीय), रांगोळी – भुमिका मोदी (प्रथम), ज्योती कवडे (व्दितीय), प्रतिक्षा गवारे (तृतीय), व्यंगचित्र – गजानन लडके, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (प्रथम), अनघा चौधरी, (व्दितीय), प्रियांका श्रीवास्तव, डीवाय पाटील एसीएस (तृतीय), पोस्टर – प्रेरणा नलोडे (प्रथम), अमेय भोंगळे (व्दितीय), आदिती चक्रावर (तृतीय), पेंटींग – अशित आढाव (प्रथम), प्रवीण बदराखे (व्दितीय), सिमरन मोमीन (तृतीय), मेहंदी – प्रतिक्षा काळे (प्रथम), कोमल मोहिते (व्दितीय), कोमल पवार (तृतीय), कथाकथन – सिमा शेरकर (प्रथम), रक्षता मंत्री (व्दितीय), आकांक्षा पोफळे (तृतीय), कथा लेखन – अंकीता जाधव (प्रथम), मानसी अगरवाल (व्दितीय), रेणुका सिंग (तृतीय), सोलो डान्स – निलोफर शेख (प्रथम), प्रसाद कुलकर्णी (व्दितीय), संज्योत ढोले (तृतीय), गायन – आर्या फडतरे (प्रथम), श्रेयसी आपटे (व्दितीय), निशाद सोनकांबळे (तृतीय), मिमिक्री – आरती राणे (प्रथम), मंदार कुलकर्णी (व्दितीय), प्रतिक कराळे (तृतीय), टेबल टेनिस – मुले – राज शिंदे (प्रथम), वेदांत कट्‍टी (व्दितीय), मुली – रितू मंदीराम (प्रथम), ऐश्वर्या पत्की (व्दितीय), वादविवाद – इंदिरा महाविद्यालय (प्रथम), जयहिंद ज्यु. महाविद्यालय (व्दितीय), डी.वाय. पाटील एसीएस पिंपरी (तृतीय), प्रश्नोत्तर स्पर्धा – जयहिंद ज्यु. महाविद्यालय (प्रथम), डी.वाय. पाटील एसीएस (व्दितीय), डी.वाय. पाटील इंजिनिअरींग (तृतीय), कबड्‌डी – एटीएसएस सीबीएससीए (प्रथम), डी.वाय. पाटील आकुर्डी (व्दितीय), डी.वाय. पाटील आकुर्डी (तृतीय), व्हॉलीबॉल – प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (प्रथम), म्‍हाळसाकांत ज्यु. महाविद्यालय (व्दितीय), पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (तृतीय), पथनाट्य – प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (प्रथम), सी.के. गोयल दापोडी (व्दितीय), डी.वाय. पाटील पिंपरी (तृतीय), शॉर्ट फिल्म – महात्मा फुले महाविद्यालय (प्रथम), पीसीसीओई (व्दितीय), एस.बी. पाटील ज्यु. महाविद्यालय (तृतीय), फुटबॉल – इंदिरा महाविद्यालय (प्रथम), जेएसपीएम (व्दितीय), डी.वाय. पाटील (तृतीय), टेबल टेनिस सांघिक – पीसीसीओई (प्रथम), इंदिरा महाविद्यालय (व्दितीय), मुकअभिनय – प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (प्रथम), एस.बी. पाटील महाविद्यालय (व्दितीय), एकांकीका स्पर्धा – इंदिरा महाविद्यालय (प्रथम), पीसीसीओई (व्दितीय), लोकमान्य होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय (तृतीय), एटीएसएस सीबीएससीए (प्रथम), शो स्टॉपर – डी.वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय (प्रथम), डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय (व्दितीय), डी.वाय. पाटील एसीएस (तृतीय), सांघिक नृत्‍य – डी.वाय. पाटील (प्रथम), एसएनबीपी (व्दितीय), प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (तृतीय).

Latest News