कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा – अभिनेत्री कंगणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकरांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे. ‘मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.’ असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे कंगनानं पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन.

Latest News