आ.शिवेंद्रराजे भोसलेंनी सातारकरांसाठी स्वखर्चाने उभारले 80 बेडचे कोविड सेंटर!

सातारा- पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.याबाबत,खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भीती व्यक्त करत प्रशासनास ठोस पाऊले उचलण्याचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर ,सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाहीयेत आणि त्यामुळे,मोठ्या प्रमाणावर जिल्हातील रुग्ण दगावत आहेत.तसेच अनेकांना उपचार भेटत नाहीत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने भाजपाचे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने ८० बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये ४० बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत ४० बेड विना ऑक्सिजनयुक्त आहेत.हे कोव्हीड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी विनामोबदला जिल्हा प्रशासनाकडे चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत.

येत्या बुधवारी हे सेंटर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या सेंटरमध्ये बाधीतांवर उपचार सुरु होणार आहेत.

Latest News