हाथरस: पीडितेवर बलात्कार झालाच नसल्याचा पोलिसांचा दावा


हाथरस – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली या मुलीचा मृत्यू तिच्या मानेला दुखापत झाल्यामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. तिच्या बलात्कार झाला नसल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाले आहे. जातीय तेढ वाढवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. न्यायवैद्यक अहवालात तिच्यात कोणतेही विर्याचे नमुने सापडले नाहीत. त्यामुळे जातीय तणाव वाढवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले.