उत्तर प्रदेशच्या गुंडाराजमध्ये महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन- यशोमती ठाकूर


मुंबई | उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अटक केली. त्यासोबतच राहुल गांधींना युपी पोलिसांनी धक्काबुक्की केली. यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रदेशच्या गुंडाराजमध्ये महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या लोकशाहीचा मुडदा पाडला जात आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पीडित बलात्कारीच्या मृतदेहाला परस्पर आग्नि देणं हे मानवतेच्या नियमाबाहेर असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.