एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत जमा होईल


मुंबई | काही महिन्यांपासून रखडलेल्या एसटी महामंडळाच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत जमा होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पगाराची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी याबाबतची मागणी केली. या भेटीत कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याचं त्यांनी मान्य केलं. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय.