भाजपच्या विनाशी वाटचालीस सुरुवात झाली- अमोल मिटकरी


मुंबई | उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील बलात्कारी पीडितेच्या कुंटूंबाला काँग्रेस नेते राहुल गांधी भेट घेण्यासाठी आले होते. मात्र युपी पोलिसांनी गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांच्या कॉलरवर हात टाकला आणि त्यांना अटकही केली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अशा पद्धतीने वागणूक देणाऱ्या हिटलर शाहीचा करावा तितका निषेध कमीच आहे. भाजपच्या विनाशी वाटचालीस सुरुवात झाली. अशा मस्तवाल सरकारचा धिक्कार, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.