हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओ


लखनऊ | हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसत आहे. पीडितेच्या वहिनीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी माझ्या सासऱ्यांना तुमची मुलगी कोरोनाने मेली असती तर तुम्हाला नुकसानभरपाई मिळाली असती का?, असा प्रश्न विचारल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
हे प्रकरण दाबण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.