कर्मचाऱ्यांना मोबदल्याशिवाय ओव्हरटाइम करण्यास भाग पाडता येणार नाही- SC

नवी दिल्ली | कोरोनाचं कारण देत कर्मचाऱ्यांना मोबदल्याशिवाय ओव्हरटाइम करण्यास भाग पाडता येणार नाही. कामगारांना मोबदला न देताच अतिरिक्त काम करून घेणं गैर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. कोरोना लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीमुळे मोबदला न देताच 3 तास अतिरिक्त काम करून घेण्याची मुभा एक अधिसूचना काढून गुजरात सरकारने कारखानदारांना दिली होती. गुजरात मजदूर सभेने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत मंदीची सगळी जबाबदारी एकटय़ा कामगार वर्गावर टाकता येणार नाही, असं स्पष्ट करत न्यायालयाने यासंदर्भातील आदेश रद्द केलेत.