पंजाब नॅशनल बँकेत सिन्टेक्स इंडस्ट्रीजने 1,203.26 कोटी रुपयांचा घोटाळा


नवी दिल्ली | सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत सिन्टेक्स इंडस्ट्रीजने 1,203.26 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. पीएनबीच्या अधिकृत दस्तावेजातून ही माहिती समोर आली आहे. सेबीने बंधनकारक केलेल्या ‘सूचिबद्धता बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता’ तरतुदी आणि बँकेचे धोरण यानुसार, पीएनबीने दाखल केलेल्या नियामकीय दस्तावेजात ही माहिती देण्यात आली आहे. ‘सिन्टेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ने घेतलेल्या 1,203.26 कोटी रुपयांच्या कर्जात घोटाळा केला आहे. कंपनीचे हे कर्जखाते ‘एनपीए’मध्ये गेले आहे. बँकेच्या अहमदाबाद झोनल कार्यालय शाखेशी संबंधित हे कर्ज प्रकरण आहे, असं बॅंकेने म्हटलंय.