कोणालाही घाबरणार नाही तसेच कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही


नवी दिल्ली | कोणालाही घाबरणार नाही तसेच कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही, असं काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी देशवासीयांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच असत्याच्याविरोधात सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. मी या जगात कोणालाही घाबरणार नाही. मी कोणाच्याही अन्याjeयासमोर झुकणार नाही, मी असत्याला सत्याच्या मार्गानं जिंकेन आणि असत्याचा विरोध करत मला सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद मिळावी. गांधी जयंतीच्या शुभेच्छा, असं राहुल गांधी म्हणालेत.