हाथरस: बलात्काराच्या वाढत्या घटनांमागील कारण म्हणजे देशात वाढणारी बेरोजगारी

katju

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस सामूहिक बलात्कारासारख्या घटनांना बेरोजगारी जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांमागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे देशात वाढणारी बेरोजगारी आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा मी निषेध करतो आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याचंही मी आवाहन करतो, असं मार्कंडेय काटजू यांनी म्हटलंय.

पुरुषांमध्ये शारीरिक संबंधांची नैसर्गिकरित्या तीव्र इच्छा असते. पण बेरोजगारी आहे आणि ती वाढत जात आहे. त्यामुळे तरूणांचे विवाह होत नाहीत. यामुळेच सामान्य गरज असलेल्या वयात येऊनदेखील मोठ्या प्रमाणात तरूण शारीरिक गरजेपासून वंचित राहतात, असं मार्कंडेय काटजू यांनी म्हटलं आहे.

Latest News