हाथरस: मुलगा दोषी असेल, तर त्याला सगळ्यांसमोर गोळ्या घाला

Hathras-e1601688378117

लखनऊ | उत्तर प्रदेशात हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडवून दिली आहे. या घटनेमुळे विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला घेरलंय. हाथरसमधील सामूहिक बलात्काराची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं. यातील एका आरोपीच्या वडिलांनी मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. अटक करण्यात आलेल्या रामू नावाच्या आरोपीच्या वडिलांनी हा दावा केल्याची माहिती आहे. माझा मुलगा दोषी असेल, तर त्याला सगळ्यांसमोर गोळ्या घाला. पण या घटनेत निर्दोष लोकांना फसवण्यात आलं आहे, असं आरोपीच्या वडिलांनी म्हटलंय.

Latest News