हाथरस: या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी चकार शब्दही काढले नाही – राहुल गांधी

rahul-gandiii

हाथरस बलात्कार पीडितेचे कुटुंब एकटे नाही आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी चकार शब्दही काढले नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे. शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे, माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे

राहुल गांधी म्हणाले की आमची यात्रा मोदी सरकारच्या तीन काळ्या कायद्यांविरोधात आहे. देशातली व्यवस्था नष्ट करण्याची तयारी सुरू असून आधी नोटबंदी मग जीएसटी आणला गेला. आम्ही पंजाब आणि हरयाणाच्या शेतकर्‍यांच्या सोबत आहोत. नोटबंदीमुळे गरीबांचे हाल झाले, जीएसटीमुळे उद्योजक उध्वस्त झाले. लॉकडाऊनमुळे मजुरांचा रस्त्यात मृत्यू झाला. मी जेव्हा कोरोनाबद्दल बोललो तेव्हा माझी टर उडवली गेली. 20 -21 दिवसात कोरोना संपेल असे ते म्हणत होते, पण कोरोनाचे संकट त्यांना कळालेच नाही असेही राहुल गांधी म्हणाले.

Latest News