महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपचा दृष्टीकोन – प्रकाश आंबेडकर


पुणे | उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेमुळे भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला आहे. महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपचा दृष्टीकोन असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ते पुण्यात बोलत होते. तरूण पिढी आता महिलांवरील अत्याचारांकडे एका वेगळ्या नजरेतून पाहताना दिसत असल्याचंही आंबेडकर म्हणाले.