कंगणाला वाय प्लस सुरक्षा, ज्या मुलीवर अत्याचार झाले तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा तर सोडाच उलट …


मुंबई | उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणावरून राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हाथरस प्रकरणानंतर मोदी सरकार शांत बसलं आहे. कंगणाला वाय प्लस सुरक्षा दिली जाते. ज्या मुलीवर अत्याचार झाले तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा तर सोडाच उलट त्यांची नार्को टेस्ट करण्याचा विचार सुरू आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हे सर्व नक्की कोणाच्या डोक्याने चालतं हे मला समजत नसल्याचं भुजबळ म्हणाले.