ड्रग्ज प्रकरणात: अखेर रिया चक्रवर्तीला जामीन

Rhea-&-Shouvik-Chakraborty-at-ED-office-in-mumbai-photos-HD

Rhea-&-Shouvik-Chakraborty-at-ED-office-in-mumbai-photos-HD

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला आहे. एनसीबीने तीन दिवस 15 तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक केली होती. ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Latest News