पक्षासाठी अनुकूल परिस्थिती असताना त्यांनी पक्ष सोडू नये – गिरीष महाजन


मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. अनेकवेळा खडसेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीष महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रतिकूल परिस्थितीत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काम केलं आहे. त्यामुळे आता पक्षासाठी अनुकूल परिस्थिती असताना त्यांनी पक्ष सोडू नये, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे. सरकारनामाशी ते बोलत होते. दरम्यान, एकनाथ खडसेंची नाराजी लवकरच दूर करण्यात येईल, असंही महाजन यांनी सांगितलं आहे.