शशिकला यांची 2000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त


नवी दिल्ली – आयकर विभागाने तमिळनाडुच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या एकेकाळच्या सहकारी एआयआयडीएमकेच्या नेत्या व्ही.के. शशिकला यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
आयकर विभागाने तमिळनाडूतील कोडानाड आणि सिरूथवूर भागातील शशिकला यांची 2000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापुर्वी मागिल वर्षी नोव्हेंबर महिन्यात देखील प्राप्तीकर विभागाने शशिकला यांची 1500 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली होती.