एक राजा बिनडोक, मराठा मोर्चाला पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर हल्लाबोल

दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं – प्रकाश आंबेडकर0

मराठा मोर्चाला पाठिंबा, एक राजा बिनडोक : प्रकाश आंबेडकर

सुरेश पाटील यांनी माझ्याशी संपर्क साधला, 10 तारखेच्या मराठा मोर्चाला वंचितने पाठींबा देण्याची विनंती केली, वंचित बहुजन आघाडीचा 10 तारखेच्या बंदला पाठिंबा, मराठा समाज आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही वेगळ्या गोष्टी, कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची दक्षता घेतली जावी. आरक्षणावरून सध्या मराठा समाजातील विविध संघटनात सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. राज्य शासनाला आरक्षण देण्याचा आधिकार नाही. दोन्ही राजांचा बंदला पाठींबा आहे असं मी कुठं वाचलं नाही. एक राजा (उदयनराजे) तर बिनडोक आहे. आम्हाला नाही तर सरसकट सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी त्यांची भूमिका चुकीची आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला कधीही घाबरत नाही. एमपीएससीच्या परिक्षेबातत शासनाने निर्णय घ्यावा

राहुल गांधींची पदयात्रा, ठिकठिकाणी ट्रॅकरवरुनही निदर्शने

शेतकरी कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी देशभरात ट्रॅक्टर आणि पदयात्रा काढणार आहेत. पंजाब हरियाणानंतर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक,मध्यप्रदेश सह देशभरात राहुल गांधी ट्रॅक्टर आणि पदयात्रा करणार आहेत. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राहुल गांधींची पदयात्रा असेल. यवतमाळ,वर्धा,नागपूर, वाशीम, जालना जिल्ह्यात 40 किलोमीटरची ही पदयात्रा असेल

राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर अनेक मराठा संघटनांचे प्रतिनिधी आणि मराठा समाजाचे नेते मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी करु लागले. त्यामुळे समस्त ओबीसी आणि भटके समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण राज्य सरकारने करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभर ओबीसी-भटके विमुक्त समाज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करत आहे

गुप्तेश्वर पांडेंवर अनिल देशमुखांचा हल्लाबोल

गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळणे हा त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही केवळ म्हटलं होतं की महाराष्ट्रची बदनामी करणाऱ्या पांडे ना तिकीट मिळालं तर देवेंद्र फडणवीस प्रचार करणार का?, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सवाल

Latest News