इंडिगोच्या फ्लाईटमध्ये मुलाला जन्म हे मूल आता आयुष्यभर विनामूल्य हवाई प्रवास

flight

एका महिलेने दिल्ली ते बेंगळुरूला इंडिगो विमानात मुलाला जन्म दिला असून याबाबत इंडिगोने काढलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की आई व मूल दोघेही निरोगी आहेत आणि सायंकाळी 7:40 वाजता विमान बंगळुरू विमानतळावर दाखल झाले. त्याचबरोबर इंडिगोच्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की दिल्लीहून बंगळुरूला उड्डाण करणाऱ्या फ्लाईट 6E 122 मध्ये एक प्रीमैच्योर मुलाचा जन्म झाला. अद्याप पुढील तपशील उपलब्ध नाही. फ्लाईटचे उड्डाण डिलीवरीदरम्यान सामान्य होते.

या महिलेने मुलाला दिल्ली-बेंगळुरू उड्डाण क्रमांक 6E 122 च्या वाटेवर जन्म दिला. हे विमान बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता बेंगळुरू विमानतळावर उतरले. त्या महिलेचे व मुलाचे बंगळुरू विमानतळावर विमान उतरताच जोरदार स्वागत झाले. प्राप्त माहितीनुसार फ्लाईटमध्ये जन्मलेल्या मुलाला इंडिगो एअरलाइन्सने एक खास भेट दिली आहे. हे मूल आता आयुष्यभर विनामूल्य हवाई प्रवास करण्यास सक्षम असेल.

Latest News