आता संभाजी भिडे कुठे आहेत?

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबाबत केलेलं वक्तव्य त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारं नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. माझ्याकडून अशाप्रकारचं वक्तव्य झालं होतं. तेव्हा संभाजी भिडेंनी आंदोलनाची हाक दिली होती. आता संभाजी भिडे कुठे आहेत, असा सवाल राऊतांनी केला आहे. दरम्यान, संभाजी भिडे आता राऊतांच्या या चिमट्याला काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.