उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्ये काँग्रेसच्या राज्यात सर्वप्रकारचे गुन्हे वाढले- मायावती

maya-sonia

उत्तर प्रदेश | बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राजस्थानातील पुजाऱ्याला जाळण्यात आलेल्या घटनेवरून मायावती यांनी निशाणा साधलाय. मायावती ट्विट करत म्हणाल्या, उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्ये काँग्रेसच्या राज्यात सर्वप्रकारचे गुन्हे वाढले आहेत. अर्थातच तिथे देखील कायद्याचं नाही तर जंगलराज सुरूये.

राजस्थानमध्ये काँग्रेस नेते सरकारवर निशाणा साधण्याऐवजी गप्प बसलेत. याचा अर्थ उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ज्या पिडीतांची यांनी भेट घेतली, ते केवळ मतासाठीचे राजकारण होतं, बाकी काहीच नाही, असा टोलाही मायावती यांनी लगावला.

Latest News