कोडिंग: विद्यार्थ्यांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये – शिक्षणमंत्री

मुंबई | सहावी इयत्तेपासून कोडिंग अनिवार्य असं सांगणारी एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. याद्वारे हजारोंचे शुल्क उकळण्याचा प्रकार सुरु आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि राज्य शासनाकडून असा कोणताही निर्णय अद्याप झाला नसून पालक, विद्यार्थ्यांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये, असं आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी अशा तक्रारींची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना टॅग करून यासंदर्भात स्पष्टीकरणाची विनंती केली. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हे आवाहन केलंय.

Latest News