मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन


मुंबई | राज्यात लॉकडाऊननंतर मिशन बिगेन अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहे. मात्र मंदिर उघडण्यास अजून राज्य सरकारने परवानगी दिली नाहीये. राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलंय. या आंदोलनात पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु असून धर्मगुरू आणि आचार्य लाक्षणिक उपोषणावर आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात ‘मंदिरं बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझं सरकार’, अशी फलकबाजी देखील करण्यात येतेय.