वीजपुरवठा हा अपघात होता की घातपात तपासणीचे निर्देश

मुंबई | वीज खंडित होण्यामागे काही गाफीलपणा झाला आहे का, याच्या तपासणीचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच तीन-साडेतीन तासांतच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत केल्याचा दावा सरकारने केला आहे. हा अपघात होता की घातपात, अशा प्रश्नांची सरबत्ती करत झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत ‘वर्षा’ निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत दिले. येत्या चार दिवसांत मुसळधार परतीच्या पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही विजेच्या मागणीचा विचार करून सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.