NEET परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर रोजी

मुंबई | वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल येत्या 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (एनटीए) अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. कोरोना संकटामुळे जे विद्यार्थी 13 सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परीक्षेला बसू शकलेले नाहीत त्यांची परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी घेण्याचे आदेश सर्वेच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, विद्यार्थी आपला निकाल ntaneet.nic.in या वेबसाईटवर पाहू शकणार आहेत.