सभागृहातील मानदंडा समोरील अडथळा हटवा,अन्यथा आंदोलन :राजू मिसाळ

 

पिंपरी (प्रतिनिधी ) महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात मा. महापालिका सभा होत असतात. या सभेचे पीठासन अधिकारी (मा. महापौर) यांच्या आसनासमोर प्रथेप्रमाणे मानदंड ठेवला जातो. सभा कामकाजामध्ये विरोधकांना प्रखर विरोधच्या वेळी आपले म्हणणे ठामपणे मांडून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विरोध करण्यासाठी मानदंडापर्यंत जाण्याची  प्रथा आहे. लोकशाही परमपंरेमध्ये हा विरोधकांचा हक्क आहे. त्यामुळे महापौर च्या आसना समोरील मानदंड समोरील अडथळा तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांनी दिला आहे

स्फोटक वातावरण निर्माण झाल्या मानदंड उचलला गेल्यास वातावरण शांत होते.

दिवसापासून मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पीठासन अधिका-यांच्या (मा.महापौर) आसनासमोर मानदंडासमोर सत्ताधारी पक्षाने जाणून बजून अडथळा निर्माण केला आहे. जेणे करुन विरोधकांना मानदंडापर्यंत जाता  येणार नाही. वस्तुत:  सन २०१२ पासून हे नविन सभागृह अस्तित्वात आले तेव्हा राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता असताना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने विरोधकांना कायम आदराची वागणूक दिलेली आहे. मानदंडासमोर अडथळा निर्माण करण्याची हि कल्पना कोणाच्या सुपिक डोक्यात आलेली आहे.

माई तुम्ही सुध्दा पूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये होता. त्यावेळी आपण विरोधकांना अशी वागणूक दिली आहे का? आणि आता तुम्ही विरोधकांना अशी वागणूक देत आहात. हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला प्रथेचा भंग करणारे आहे. तसेच विरोधकांच्या हक्कावर गदा आणली  जातअसल्याचा आरोप मिसाळ केला आहे

Latest News