चंद्रकांतदादा यांनी ज्या भागात कृषी विधेयकसाठी रॅली काढली. त्याच भागात त्याच्या विचाराचा साखर कारखाना बंद

SUPRIYASULE

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सतत पवार कुटुंबियांना लक्ष करत आहेत. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या भागात कृषी विधेयकसाठी रॅली काढली. त्याच भागात त्याच्या विचाराचा साखर कारखाना बंद आहे. त्यामुळे त्यांनी लक्षात ठेवावे. तसेच पवार कुटुंबियावर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत. त्यामुळे कोणीही यावं आणि आपलं मन मोकळं करावं, आम्ही दिलदार आहोत, अशा शब्दात सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे शहरातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढाच्या कामाबाबत दोन दिवसांत वर्क ऑर्डर  काढली जाणार आहे. तसेच पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून होणाऱ्या पूर परस्थितीस आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नाही. सीमा भिंत दोन वर्षांपूर्वी पडली असून अजूनही त्याच काम पूर्ण झाले नाही. तर यामध्ये २५वर्षाचा हिशोब कसा होऊ शकतो, असा प्रतिप्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारत त्यांच्यावर निशाणा साधला.

जोरदार झालेल्या पावसामुळे यंदा देखील पुणे शहरात अनेक भागांत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. यामध्ये सर्वाधिक फटका कात्रज आणि अंबिल ओढा भागातील नागरिकांना बसला. यावर अजित पवार म्हणाले की, दोन वर्षाहून देखील त्या परिसरात सीमा भिंतीचे काम झाले नाही. त्या कामावर महापालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होते असे सांगत, सत्ताधारी भाजपाला त्यांनी चांगलाच टोला लगावला.

अजित पवार म्हणाले की, पुणे शहर आणि परिसरात मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी कात्रज आणि अंबिल ओढा भागातील सीमा भिंत कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले होते. तर यंदा देखील जोरात पाऊस झाल्याने अनेक घरात पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेथील परिसरात सीमा भिंत बांधण्याचे कामाबाबत पुणे महापालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होते. आजपर्यंत सीमा भिंत का बांधली गेली नाही? यामागील नेमके कारण काय ? या संदर्भात अधिकारी वर्गाला विचारणा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Latest News