पिंपरीत फ्लॅट विकण्यासाठी धमकी देत महिलेचा विनयभंग

vinaybhang

पिंपरी: महिला आणि तिचे कुटुंब राहत असलेला फ्लॅट तिने विकावा यासाठी सात जणांनी मिळून महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेच्या वडिलांना मारहाण केली. याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी साडेपाच वाजता डेअरी फार्म रोड, पिंपरी येथे घडली. अशोक चेतवणी, जगदीश चेतवणी, सुरेश चेतवणी, मनीष चेतवणी, रेख चेतवणी, सिमरण चेतवणी, रीत्विका चेतवणी (सर्व रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिडीत महिलेने रविवारी (दि. 18) पिंपरी पोलीसा ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत महिला आणि तिचे कुटुंब राहत असलेला फ्लॅट तिने खाली करून तो दिलीप चेतवणी याला विकावा अशी आरोपींनी मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. त्यावरून आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी अशोक आणि सुरेश या दोघांनी पिडीत महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना हाताने मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Latest News