पुण्यात फेसबुक फ्रेंड पडली महागात

Zuckerberg planea integrar WhatsApp, Instagram y Facebook Messenger

En la imagen de archivo, siluetas de personas junto a un logo de Facebook en esta imagen ilustrativa del 28 de marzo de 2018. REUTERS/Dado Ruvic

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे बारामतीतील एका महिलेला महागात पडले आहे. संबंधित व्यक्तीने महिलेला पुण्यात बोलवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पंकज रामनाथ उदावंत (वय 37, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजने एप्रिल 2018 मध्ये फिर्यादी महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. महिलेने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. त्यांचा संवाद वाढल्यामुळे महिलेचा पंकजवर विश्वास बसला. त्यानंतर त्याने महिलेला पुण्यात भेटण्यासाठी बोलविले होते. पंकजने महिलेला एका नातेवाईकाच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पंकजने पुन्हा महिलेला पुण्यात बोलावून तिच्यावर अत्याचार केले तिचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्यामुळे अत्याचाराला कंटाळून महिलेने त्याला भेटण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे पंकजने महिलेचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकाला पाठवून देत बदनामी केली. त्यानंतर महिलेने बारामती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. बारामती पोलिसांनी हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे वर्ग केले होते. त्यानुसार हडपसर पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीला अटक केली.

Latest News