बेकायदेशीरपणे हॉटेलमध्ये दारूविक्री आणि हुक्का पार्लर चालवणा-या हॉटेलवर देहूरोड पोलिस कारवाई

hukka-parlour

देहूरोड: बेकायदेशीरपणे हॉटेलमध्ये दारूविक्री आणि हुक्का पार्लर चालवणा-या एका हॉटेलवर देहूरोड पोलिसांनी कारवाई केली. त्यात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 22) मामुर्डी येथील हॉटेल सेव्हन वॉटर व्हिलेज येथे करण्यात आली. राहुल शांतीलाल रजक (वय 28, रा. गहुंजे गाव, ता. मावळ), प्रदीप फुल्लू रजक (वय 21), प्रदीप जयप्रकाश सिंह (वय 40), अनुप सुरेंद्र सिंह (वय 35, रा. निगडी प्राधिकरण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई राहुल अर्जुन वाघमारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून मामुर्डी येथील हॉटेल सेव्हन वॉटर व्हिलेज या हॉटेलमध्ये विनापरवाना, बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री केली. तसेच हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना हुक्का ओढण्यास दिला. देहूरोड पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Latest News