पुणे शहरातील दुचाकी चोरणाऱ्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनकडून अटक

पुणे (प्रतिनिधी ) शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अजय शिवकुमार पासवान (वय 21, रा. धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी शहरातील विविध भागात दुचाकी चोरणारा कोंढवा रस्त्याने जाणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शंकर कुंभार आणि जगदीश खेडकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अजयला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, श्रीधर पाटील, गणेश सुतार, निलेश खोमणे, प्रणव संपकाळ, हर्षल शिंदे, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, समीर बागसीराज यांच्या पथकाने केली.