पिंपरीत विनयभंग याप्रकरणी एका अनोळखी व्यक्‍तीवर गुन्हा दाखल

vinay-bhng

पिंपरी: महिलेला मोबाइलवरून अश्‍लील बोलून तिचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्‍तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली. राहूल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत महिलेने सोमवारी (दि. 26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्च 2019 पासून आरोपी राहूल हा फिर्यादी महिलेचा लपून छपून पाठलाग करीत आहेत. फिर्यादी महिलेला तिच्या फोनवर करून तिने कोणते कपडे घातले आहेत, सध्या ती कोठे आहे, याची अचूक माहिती दिली. तसेच तिच्याशी अश्‍लिल बोलून तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Latest News