भाजपशिवाय ब्राह्मणांना पर्यायच नाही- हरिद्वार दुबे


नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या निवडणुकांसाठी आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आठमधील दोन उमेदवार हे क्षत्रिय आणि दोन ब्राह्मण देण्यात आल्याने जातीय समिकरणांच्या आधारे उमेदवार देण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. अशातच उमेदवारी मिळालेले भाजपचे उमेदवार हरिद्वार दुबे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप वगळता कोणी ब्राह्मण सन्मान देत नाही. भाजप आणि ब्राह्मणांचे एवढे चांगले संबंध आहेत की ते शब्दात मांडता येणार नाही. सर्वांना ठाऊक आहे ब्राह्मण कोणाच्या बाजूने जाणार? उगाच काही लोकं या गोष्टीला हवा देतात. ब्राह्मण भाजपबरोबरच राहणार, असं दुबे प्रसारमाध्यामांशी बोलताना म्हणाले.
ब्राह्मण ससुर जाएगा कहां, अशी दुबे यांची पहिली प्रतिक्रिया होती. ब्राह्मण ससुर जाएगा कहां, तुम्हीच सांगा कुठे जाणार ब्राह्मण, असं दुबे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दुबे यांनी विश्वास व्यक्त करताना वापरलेल्या भाषेमुळे नव्या वादाला तोंड फुटत राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.