पिंपरीत पत्नीला धमकी माझ्या मुलीला दे नाहीतर…

पिंपरी – ‘माझ्या मुलीला तू मला दिले नाहीस तर मी तुला तलवारीने कापून टाकेल’ अशी धमकी माहेरी राहणाऱ्या पत्नीला दिल्याची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. ही घटना शिवराज नगर, रहाटणी येथे घडली. पती सुरज गुलाबचंद यादव (वय 32), नणंद गीता गुलाबचंद यादव, सासू राजकुमारी गुलाबचंद यादव (तिघे रा. शास्त्री नगर, डिलक्‍स चौक, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. विवाहिता तिच्या माहेरी असताना आरोपी सूरज तिथे गेला. जबरदस्तीने घरात घुसून धमकी दिली.

Latest News