अमेरिकेच्या अध्यक्षीय कोण मारणार बाजी? जो बायडन यांच्यावर मतं चोरी केल्याचा आरोप

biden_trump_30th_oct_2

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीसाठी मतदान पूर्ण झाले आहे आणि मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की आज रात्री (अमेरिकन वेळेनुसार) मोठी घोषणा करणार आहेत.

एवढेच नाही तर, ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यावर मतं चोरी केल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केले- ‘आपण खूप पुढे आहोत, मात्र ते मतं चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना कधीही ते करू देणार नाही. मतदान बंद झाल्यानंतर मतदान करता येणार नाही! ‘ तर, दुसर्‍या ट्विटमध्ये ट्रम्प म्हणाले- मी आज रात्री एक मोठी घोषणा करेन. एक मोठा विजय! ‘

मात्र, ट्रम्प यांचे हे ट्विट ट्विटरद्वारे ब्लॉक करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या ट्विटच्या अगदी वरच्या संदेशात मायक्रो-ब्लॉगिंग साइटने लिहिले आहे- ‘या ट्विटमध्ये लिहिलेली माहिती वादग्रस्त आहे. हे निवडणुका किंवा इतर नागरी प्रक्रियांबद्दल दिशाभूल करणारे असू शकते.

बायडन आघाडीवर ट्रम्प यांनी पिछाडी

निवडणुकीच्या निकालांबाबत बोलायचे झाल्यास अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये विजय मिळविला आहे. त्याचबरोबर, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक महत्त्वपूर्ण राज्यांमध्ये आघाडीवर आहेत. न्यूयॉर्कमध्ये, बायडन यांना 22 लाख मतं मिळाली आणि ट्रम्प यांना 12 लाख. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, माजी उपराष्ट्रपतींनी कोलोरॅडो, कनेक्टिकट, डेलावेर, इलिनॉय, मॅसेच्युसेट्स, न्यू मेक्सिको, व्हर्माँट आणि व्हर्जिनिया येथे विजय मिळविला आहे. अध्यक्ष ट्रम्प अलाबामा, आर्कान्सा, केंटकी, लुझियाना, मिसिसिप्पी, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, ओक्लाहोमा, साउथ डकोटा, टेनेसी, वेस्ट व्हर्जिनिया, वायमिंग, इंडियाना आणि दक्षिण कॅरोलिना येथे आघाडीवर आहेत.

Latest News