मोदी सरकारने राष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती परस्पर केली रद्द! स्मृती इराणींसाठी

smriti_pti_660x450_052319092919

नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रुरकी येथील आयआयटी संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल काकोडकर यांची नियुक्ती केली होती. परंतु मोदी सरकारने ही नियुक्ती परस्पर रद्द केली. मोदी सरकारने हा निर्णय स्मृती इराणींसाठी घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

नियुक्ती मागे घेण्याचा अर्ज न करता थेट नवीन प्रस्ताव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देऊन तो मान्य करुन घेतला. केवळ स्मृती इराणी यांचे डॉ. अनिल काकोडकर यांच्यासोबत मतभेद झाल्याने त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

डॉ. अनिल काकोडकर यांच्या जागी बी. व्ही. आर. मोहन रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रेड्डी हे आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष असतानाही त्यांच्याकडे रुरकीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. अनिल काकोडकर यांनी स्वत:च्या मर्जीतील व्यक्तींना संचालक मंडळावर घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा एका मुलाखतीत स्मृती इराणींनी केला होता. मात्र हे सगळे आरोप काकोडकर यांनी फोटाळून लावले आहेत.

Latest News