भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे घरातून गायब

usha-kakade

मेव्हण्याला गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी गेले होते. मात्र, काकडे दाम्पत्य घरातून गायब झाल्याची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली आहे.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यामध्ये काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता संजय काकडे आणि उषा काकडे या दोघांनाही अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी आणि कार्यालयात गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. त्यामुळे काकडे दांपत्य नेमके कुठे गेले आहेत? याचा तपाास पोलीस करत आहेत.

युवराज ढमाले (वय 40) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्यामध्ये भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्ररित्या व्यवसाय करत आहेत. ऑगस्ट 2018 मध्ये ढमाले संजय काकडे यांच्या घरी गेली असता काकडे यांनी त्याला तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात धमकी दिली होती.

Latest News