नितीश आणि मोदी या दोघांनी मिळून बिहारला लूटले – राहुल गांधी


नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणूकीचं प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय पक्ष सत्तेसाठी अनेक नव-नवे फंडे वापरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहे. बिहार विधानसभेच्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून, आता शेवट्या टप्प्यातील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा बिहार विधानसभेच्या प्रचारासाठी उतरले आहे. मंगळवारी राहुल यांनी किशनगंज येथील प्रचारसभेत जनतेला संबोधित केलं. त्यांनी महागठबंधनला मतदान करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. तसेच त्यांनी मोदी आणि नितीश कुमारवर सुद्धा निशाणा साधला.
राहुल म्हणाले की, नितीश आणि मोदी या दोघांनी मिळून बिहारला लूटले आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी तसेच लघु उद्योगांना नष्ट केलं आहे. आता बिहारची जनता त्यांना चांगला धडा शिकवेल व भाजपला बिहारमधून हद्दपार करेल आणि महागठबंधनला विजयी करेला असे प्रतिपादन राहूल गांधी यांनी केले आहे. छत्तीसगढ सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकते मात्र बिहार सरकार शेतकऱ्यांकडून पैसे लुटते. असे म्हणत राहुल यांनी भाजपवर हल्लाबोल केला. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर केले. मात्र हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नसुन, याचा शेतकऱ्यांना फायदा कमी नुकसान जास्त होणार आहे. असे राहुल म्हणाले.