मतदानाचे कल पाहता ज्यो बिडेन यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू…

bidan

वॉशिंग्टन : आज दिवसभराच्या मतमोजणीदरम्यान जरी अनिश्‍चितता कायम रहिली असली तरी मतदानाचे कल पाहता डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे लक्षात येते आहे. दिवसभरात बिडेन यांच्या नावावर 238 तर ट्रम्प यांच्या नावावर 213 इलेक्‍टोरल कॉलेज व्होट जमा झाले होते.

उर्वरित राज्यांमधील पेनसिल्वेनियामध्ये 20 इलेक्‍टोरल व्होट असून अध्यक्षपदासाठी ती महत्वाची ठरणार आहेत. मिशिगन, विस्कॉन्सिन, नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया आणि नेवाडा इथल्या मतमोजणीचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे आहेत. त्यामुळे ट्रम्प आणि बिडेन यांच्यातील अध्यक्षपदाची रस्सीखेच अधिक तीव्र झाली आहे. आज दिवसभरामध्ये अध्यक्ष नक्की कोण होणार याचे चित्र स्पष्ट होणार नाही, हे तर नक्की झाले आहे.

ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीमध्ये ज्या राज्यांमध्ये विजय मिळवला होता, तेथे त्यांचा विजय याही वेळी झाला आहे. तेथे बदल व्हावा यासाठी बिडेन यांनी आटापिटा केला आहे. याशिवाय कोलोरॅडोमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळाला. मात्र अल्बामामध्ये मात्र रिपब्लिकन पक्षाचा विजय झाला.

मियामीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मत्र ओहिओ आणि मिडवेस्टमध्ये अनपेक्षितपणे डेमोक्रॅटिक पक्षाला यश मिळाल्याचे बिडेन यांच्या प्रचार अधिकाऱ्यांनी सांगितले. 2016 मध्ये ट्रम्प यांनी उत्तर अमेरिकेतील ज्या तीन राज्यात विजय मिळवला होता. त्यातील पेनसिल्वेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिनमध्ये विजय मिळण्याचा बिडेन यांना विश्‍वास वाटतो आहे.

फ्लोरिडामध्ये बिडेन यांना अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. मात्र न्यूजर्सी आणि न्यूयॉर्कमध्ये बिडेन यांची सरशी झाली आहे. याशिवाय बिडेन यांनी कोलोरॅडो, कनेक्‍टिकट, डेलवेअर, इलिनॉय, मॅसेच्युसेट्‌स, न्यू मेक्‍सिको, व्हर्मॉंट आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ट्रम्प यांनी अल्बामा, आर्कान्सा, केंटकी, लुईझियाना, मिसिसिपी, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, ओक्‍लाहोमा, साऊथ डकोटा, टेनेसी, वेस्ट व्हर्जिनिया, वायोमिंग, इंडियाना आणि साऊथ कॅरोलिनामध्ये विजय मिळवला आहे.

US Election Results 2020

Donald Trump (213)Joe Biden (238)
Nebraska (5*)Colorado (9)
Louisiana (8)District of Columbia (3)
North Dakota (3)New Mexico (5)
South Dakota (3)New York (29)
Wyoming (3)Virginia (13)
Indiana (11)Illinois (20)
Kansas (6)New Jersey (14)
South Carolina (9)Vermont (3)
Alabama (9)Connecticut (7)
Oklahoma (7)Massachusetts (11)
Arkansas (6)Rhode Island (4)
Mississippi (6)Delaware (3)
Tennessee (11)Maryland (10)
Kentucky (8)New Hampshire (4)
West Virginia (5)Washington (12)
Missouri (10)Oregon (7)
Idaho (4)California (55)
Utah (6)Hawaii (4)
Ohio (18)Minnesota (10)
Montana (3)Arizona (11)
Iowa (6)Maine (4)
Florida (29)
Texas (38)

Latest News