भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करुन विनंती

ajit-dada-ncp

पिंपरी | उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली, मात्र यासाठी भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करुन विनंती करावी लागली. भाजपचे केशव घोळवे यांची पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे.

अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत असताना महेश लांडगे स्वतः राष्ट्रवादीचे नेते आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या कार्यालयात पोहोचले. माजी खासदार अमर साबळे त्यांच्यासोबत होते.

मिसाळ यांच्यासह नाना काटे, संजोग वाघेरे, मंगला कदम व इतर नेत्यांना त्यांनी सहकार्याची विनंती केली. मात्र दादा म्हणतील तसं करु म्हटल्यानंतर महेश लांडगे यांना अजित पवार यांना फोन लावावा लागला. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताच आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला, असे मिसाळ व कदम यांनी स्पष्ट केलं.

Latest News