शिरगाव पोलीस निरीक्षक म्हसवडे यांच्याविरुद्ध पोलीस आयुक्ताकडे अॅड दिपक सोरटे यांनी फिर्याद पुर्व केली तक्रार

WhatsApp-Image-2020-11-06-at-8.50.37-PM

दिनांक 3-11-2020 रोजी दिपक तुकाराम सोरटे यांची दारुंब्रे येथील वडिलोपार्जित मिळकतवर मुंबई अधिनियम कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1955 चे लगत पूर्वी पीक पाहणीला नाव लावून तहसीलदार यांच्या अर्जांवर बेकायदेशीरपणे फसवणूक करून बनावट व खोट्या कागदपत्रांच्या सहाय्याने आरोपी यांनी सोरटे यांची जमीन बळकावली होती शासन परिपत्रक महसूल विभाग क्रमांक- पी.एन.सी/1957/10 3275/एम दिनांक 9 सप्टेंबर 1957 हे नमूद तरतुदीनुसार माननीय उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी, उपविभागीय पुणे यांच्या आदेशान्वये सदर मिळकत सोरटे यांना पुन्हा प्राप्त झाली

बेकायदेशीरपणे झालेल्या मिळकती मधील हस्तांतरणाचे व दान पत्राचे सर्व फेरफार मालकी रद्द करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 61 नुसार विवक्षित वहीवाट यांची दिवाणी न्यायालयाच्या कारवाईपासून संरक्षण देण्यात आले असून अशी वहिवाट जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी वाचून हस्तांतरण योग्य नाही अशी वहिवाट कोणत्याही न्यायालयात कारवाईस पात्र असणार नाही आणि अशा हस्तांतरण रद्द बातल होईल अशी स्पष्ट तरतूद आहे. असे असताना अर्जदार यांनी ऑगस्ट 2019 मध्ये आरोपीवर ती कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून फिर्याद देण्यास गेले होते सदर बाब सिद्ध करण्यासाठी कढई पत्रक, सातबाराचे उतारे, फेरफार, शासनपरिपत्रक, न्यायालयीन आदेश व इतर कायदेशीर तरतुदी स्पष्ट करून प्रकरण सिद्ध केले तरी ही पो.निरिक्षक यांनी ही बाब दिवाणी आहे

असे सांगत कारवाई करण्यास स्पष्ट नकार दिला म्हणून सोरटे यांनी माननीय आयुक्त कार्यालयामध्ये अनेक तक्रार अर्ज दाखल केले तरी कोणतीही कारवाई न करता सोरटे यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे.पोलीस निरीक्षक म्हसवडे यांनी वरिष्ठनां अर्ज केला म्हणुन राग मनात धरून सुड बुद्धिने गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे सोरटे यांच्यावर दाखल केले आहे. कारवाईच्या बाबतीत सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या आदेशाचे देखील मसवडे यांनी पालन केले नाही.दिनांक 24 जून 2020 रोजी म्हसवडे यांची जबाबदारी निश्चित करण्याकामी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे कलम 12 अन्वये माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे अपील दाखल केले. सदर अपील चौकशीचे काम काज पूर्ण होऊन माननीय उपायुक्त परिमंडळ -२ यांनी

पोलिस निरीक्षक मसवडे यावर गुन्ह्याचे निश्चिती करून दखलपात्र व फौजदारी गुन्ह्याचा प्रकार दिसून आल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे कारवाई करावी म्हणून माननीय आयुक्त यांना अहवाल सादर केलेला आहे दिनांक .21 आॅक्टोंबर 20 20 त्याअनुषंगाने दिपक तुकाराम सोरटे यांनी अरोप केले आहे कि म्हसवडे यांनी फौजदारी प्रकरणाला दिवानी स्वरूप रूप देऊन आरोपींना वाचवण्याचा व कायद्याची अवाज्ञा करणे, सोरटे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, चुकीचा अहवाल सादर केले, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केला,न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बेकायदा अहवाल सादर केले म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसवडे व त्यांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई व्हावी म्हणून आयुक्तांच्या कडे अर्ज पूर्वक फिर्याद दाखल केली आहे.असे सोरटे यांनी पञकार परिषदेत पञकारांना सांगितले.


त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त समाजातील इतर गुन्हेगारांवर कारवाई करतात त्याप्रमाणे तात्काळ कारवाई करतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सोरटे यांना आयुक्त न्याय देतील का? अशी चर्चा सगळी कडे चालु आहे.

Latest News