पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समोरच गतिरोधकाचा अंदाज चुकला न घात झाला

accident-1

पिंपरी : गतिरोधकाचा अंदाज न दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समोरच गुरुवारी (दि. 5) रात्री बीआरटी मार्गात घडली.

आशिष अविनाथ दुर्गावळे (वय 20, साई स्वराज हौसिंग सोसायटी, सुयोगनगर तळवडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. आशिष पिंपरी चौकातून मोरवाडी दिशेने दुचाकीवरुन जात असताना पिंपरी चौकात त्याने दुचाकी बीआरटी मार्गात घुसवली. तेथून मोरवाडीच्या दिशेने चालला असताना मार्गावरील उंच असलेल्या गतिरोधकावरून त्याची दुचाकी उडाल्याने नियंत्रण सुटले. दुचाकी तेथील दुभाजकाला आदळून घसरत गेली. रस्त्यावर डोके आपटल्याने या अपघातात गंभीर जखमी होऊन आशिष यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक रमेश केंगार तपास करीत आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या समोरील बीआरटी मार्गात नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी टेबल गतिरोधक उभारण्यात आला आहे. या गतिरोधकाची उंची नियमाप्रमाणे नसल्याने वाहने आदळतात. पूर्वी येथील बीआरटी मार्गात इतर वाहन चालकांनी प्रवेश करू नये म्हणून ट्राफिक वॉर्डनची नियुक्‍ती केली होती. आता कोणत्याही चौकात वॉर्डन नसल्याने वाहन चालक बेधडकपणे बीआरटी मार्गातून प्रवेश करतात. याशिवाय बीआरटी मार्गानजीक पददिव्यांचा उजेड पुरेसा नसल्याने हा गतिरोधक रात्रीच्यावेळी दिसून येत नाही. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे

Latest News