अभिजीत बिचुकले यांचं मतदार यादीत नाव नसल्याने बिचुकलें चा गोंधळ


सातारा | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र यामध्ये पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांचं मतदार यादीत नाव नसल्याने बिचुकलेंनी संताप व्यक्त केला आहे.
बिचुकले साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मतदान केंद्रावर गेले होते. तिथे गेल्यावर मतदान यादीत नसल्याचं त्यांना समजलं. यावेळी बिचुकलेंनी बूथवर गोंधळ घातला आणि सर्व यंत्रणेचे खापर त्यांनी भाजपवर फोडलं आहे.
उमेदवार यादीत उमेदवाराचंच नाव नाही तर सर्वसामान्यांचं काय. नोंदणी झाली आहे यादीत माझ्या बायकोचं नाव आहे पण माझ नाव नाही. या भोंगळ कारभारामुळे मला मतदानापासून वंचित रहाव लागणार असल्याचं बिचुकले म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोग कसा फॉलोअप घेत होता हे मला माहिती नाही. पण यात काहीतरी षडयंत्र आहे. उमेदवारचं नाव नसणं हा भोंगळ कारभार नाही का? कोणता पक्ष आहे, हे यात शोधलं पाहिजे, असं म्हणत बिचुकलेंनी भाजपवर उघडपणे आरोप केला आहे.