पिंपरी चिंचवड येथील एका महिलेवर मानसिक /शारीरिक अत्याचार

मुंबईः पिंपरी चिंचवड येथील सांगवी या भागात महिलेवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तक्रारदार महिलेला शिवीगाळ करून, मारहाण करण्यात आले. सदर गुन्ह्यात पती, सासू, सासरे यांच्याविरूद्ध महिला अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित महिलेचा घरगुती कारणावरून पती, सासू, सासरे, नणंद यांच्याकडून छळ केला जात होता. तसेच स्वयंपाक येत नाही म्हणून तीला अपमानीत करण्यात येत असे. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन तीला माहेरी सोडले. सासरच्यांकडून पीडित महिलेला नांदवण्यास नकार देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक भोंगळे करत आहेत.